सिकलसेल तपासणी मोहीम, जिल्ह्यात 192 जण रुग्ण

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्ह्यात सिकलसेल ॲनेमियासारख्या आनुवंशिक रक्तविकाराचे वेळीच निदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आतापर्यंत एक लाख सहा हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 192 जण सिकलसेल ॲनेमिया पॉझिटिव्ह आढळले.
ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागात 7 फेब्रुवारीपर्यंत प्राधान्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे. सिकलसेल ॲनेमिया हा जन्मजात आणि आनुवंशिक आजार असल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी लवकर निदान, समुपदेशन आणि उपचार या त्रिसूत्रीवर भर देण्यात येत आहे. गावपातळीवर तपासणी, समुपदेशनावर भर देत आरोग्य विभागाच्या पथकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शाळा, महाविद्यालये तसेच विशेष तपासणी शिबिरांच्या माध्यमातून रक्तनमुने संकलित करण्यात येत आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून समुपदेशन, आवश्‍यक औषधोपचार तसेच पुढील उपचारांसाठी सेवा देण्यात येत आहे.